धाराशिवसामाजिक

लोहारा पोलिस ठाण्याच्या एकता दौडीतील यशस्वीतेबद्दल पोलिसांचा सत्कार

उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर व मित्र परिवाराचा उपक्रम

लोहारा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त लोहारा पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकता दौड या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दौडीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक सचिन केंद्रे तसेच सर्व पोलिस कर्मचारी यांचा उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकरमित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना सुंबेकर यांनी म्हटले की, “पोलिस दल हे समाजातील शिस्त, शांतता आणि ऐक्याचे प्रतीक आहे. एकता दौडीसारखे उपक्रम समाजात एकजुटीचा संदेश देतात. पोलिस दलाने ही परंपरा कायम ठेवावी,” असे ते म्हणाले.

सत्कार सोहळ्यात गुड्डू पठाण, आलताफ फकीर, शारुक पठाण, सुलतान शेख, तोहीद पठाण, समीर शेख, वशीम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोलिस कर्मचारी माधव कोळी यांनी केले.

या कार्यक्रमामुळे लोहारा शहरात पोलिस दलाबद्दल आदरभाव आणि समाजातील एकतेचा संदेश अधिक बळकट झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!