धाराशिवसामाजिक

राष्ट्रीय ऐक्याचा संदेश — लोहारा पोलिस ठाण्याच्या वतीने ‘एकता दौड’चे आयोजन

पोलिस विभागाचा उपक्रम सादरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त

लोहारा (प्रतिनिधी) जि. धाराशिव : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त पोलिस ठाणे लोहारा (धाराशिव पोलिस) यांच्या वतीने “एकता दौड” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट नागरिकांमध्ये राष्ट्रीय ऐक्य, एकोपा आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करणे हे आहे.

ही एकता दौड दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता तहसील कार्यालय, लोहारा येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोहारा येथे समाप्त होणार आहे. यामध्ये पोलिस कर्मचारी, शासकीय अधिकारी, विद्यार्थी, समाजसेवक तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून या उपक्रमातून समाजात ऐक्य आणि बंधुतेचा संदेश दिला जाणार आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अदम्य नेतृत्वामुळे देशाचे एकीकरण शक्य झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करत या दिवशी देशभरात ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला जातो. त्याच परंपरेत लोहारा पोलिस ठाण्याने हा उपक्रम हाती घेतला असून नागरिकांच्या मोठ्या सहभागीव्हावे असे आव्हान लोहारा पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस उपनिरीक्षक सचिन केंद्रे यांनी केली आहे.

आयोजक: पोलिस ठाणे लोहारा, जिल्हा धाराशिव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!