मुंबई : माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या खंबीर आणि कणखर नेतृत्वावर विश्वास ठेवून, तसेच माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासात्मक वाटचालीला पाठबळ देण्यासाठी, आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
मुंबई येथील भाजपा कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. या वेळी लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री श्री. बसवराजजी पाटील , लातूर-धाराशिव जिल्ह्याचे निरीक्षक श्री. किरण पाटील, भाजपा अनुसूचित जातीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री. दिलीपजी भालेराव आणि धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाशजी आष्टे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याची सुरुवात अहमदपूरचे माजी आमदार श्री. बब्रुवानजी खंदाडे आणि माजी प्रदेश प्रवक्ते श्री. गणेशजी हाके यांचे निलंबन मागे घेऊन करण्यात आली. त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
पक्षप्रवेश करणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये लातूरचे काँग्रेस पदाधिकारी व माजी मनपा सभापती श्री. गिरीशजी पाटील, धाराशिव जिल्हा कमिटीचे उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी सोनवणे, उमरगा पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अक्षराताई सोनवणे,श्री. मंथनजी सुनील मिटकरी, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. अमृतजी पाटील आणि तालुका उपाध्यक्ष श्री. अमरजी सोनवणे यांचा समावेश आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्याला धाराशिव व लातूर जिल्हातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!