
लोहारा (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून लोहारा तालुक्यातील भातागळी पंचायत समितीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून सुयशकुमार रंजना दत्तु दंडगुले यांचे नाव पुढे आले आहे.
सुयशकुमार दंडगुले यांचे मूळ कास्ती (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथे असून त्यांनी B.Tech (Civil) शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच, NDA कोर्स २०२२ मध्ये निवड प्रक्रिया (इंटरव्ह्यू) पूर्ण करून यशस्वी होण्याचा अनुभव त्यांनी प्राप्त केला आहे.
त्यांनी रामभाऊ महालगी प्रबोधनी, मीरा भाईंदर येथून स्वतःला सहाय्यक प्रशिक्षित (IIDL) केले आहे. पक्षकारकिर्दीत त्यांनी भाजप युवा मोर्चा लोहारा तालुका सरचिटणीस, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आत्मनिर्भर भारत लोहारा तालुका संयोजक आणि हर घर तिरंगा मंडळ संयोजक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
सुयशकुमार दंडगुले यांनी पक्षात अनेक तरुण कार्यकर्त्यांना जोडले असून यशस्वी कारकिर्द कायम ठेवण्यात मोठा वाटा उचलला आहे.
त्यांचा रा. स्व. संघ दायित्व हा देखील उल्लेखनीय आहे. ते पूर्व तालुका बौद्धिक प्रमुख राहिले असून, बजरंग दल मध्ये त्यांनी जिल्हा सुरक्षा प्रमुख म्हणून कार्य केले. तसेच, त्यांनी २०२३ मध्ये बजरंग दल शौर्य प्रशिक्षण वर्ग आणि २०१६ मध्ये प्राथमिक संघशिक्षण वर्ग पूर्ण केले आहे.
सुयशकुमार दंडगुले यांनी आपल्या इच्छेबद्दल पक्षश्रेष्ठींना सांगून, पंचायत समिती लोहारा २०२५ निवडणुकीसाठी भातागळी गणातून उमेदवारी अर्ज करण्याची तयारी दर्शविली आहे.
आपला सहकारी:
सुयशकुमार रंजना दत्तु दंडगुले
📞 ९०७५५०४५६३
Back to top button
error: Content is protected !!