(लोकशक्ती न्यूज नेटवर्क | लोहारा)
तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मार्डी येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदमय वातावरणात छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शाळेच्या पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षिका सौ. वर्षा चौधरी यांनी पेढे वाटप करून त्यांना दिवाळीच्या गोड शुभेच्छा दिल्या.
दिवाळी हा प्रकाश, आनंद आणि ऐक्याचा सण असल्याचे सांगत चौधरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व, पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचे तसेच फटाके फोडताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे मार्गदर्शन केले.
पेढे मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. विद्यार्थ्यांनी “मॅडमनी दिलेल्या गोड शुभेच्छा आम्हाला खूप आवडल्या” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शाळेत सर्वत्र सणासुदीचे वातावरण निर्माण झाले होते.
Back to top button
error: Content is protected !!