
लोहारा (जि. धाराशिव), दि. १० ऑक्टोबर –
भारतीय जनता पार्टीच्या भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा संयोजकपदी श्री. मिथुन शिवाजी राठोड यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड भाजप जिल्हाध्यक्ष मा. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
श्री. राठोड यांच्या निवडीची बातमी समजताच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. या प्रसंगी राठोड यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“भटक्या-विमुक्त समाजाच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढा देत राहणार असून, पक्षाच्या धोरणांनुसार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत भाजपा विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करू.”