धाराशिव
कानेगाव येथे तेरणा ट्रस्टच्या आरोग्य शिबिरात २२५ हून अधिक रुग्णांची तपासणी व उपचार

प्रतिनिधी : इकबाल मुल्ला, लोहारा
राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हाभरात आयोजित आरोग्य शिबिर मालिकेअंतर्गत लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे रविवारी (दि. ५ ऑक्टोबर २०२५) भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २२७ हून अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
हे शिबिर तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नेरुळ (नवी मुंबई) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन भाजप लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच नामदेव लोभे, पीआरओ विनोद ओव्हाळ, जिल्हा चिटणीस शिवशंकर हत्तरगे, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, उपाध्यक्ष राजेंद्र कदम, तालुका चिटणीस संजय कदम, बालाजी चव्हाण, शिक्षक सेल तालुकाध्यक्ष दत्ता जावळे पाटील, निकेश बचाटे, सुयेशकुमार दंडगुले, एससी मोर्चा तालुकाध्यक्ष रोहित सिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते.




