लोहारा (धाराशिव) : लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जय श्रीराम मित्र मंडळाच्या वतीने शेतकरी नेते अनिल (दादा) जगताप यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमीच अग्रस्थानी राहणारे व शेतकरी चळवळीत सक्रिय योगदान देणारे अनिल जगताप यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी मंडळातील सर्व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन व शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह प्रदान करून अनिल (दादा) जगताप यांचा सत्कार केला. यावेळी दादांनी आपल्या मनोगतात शेतकरी हेच राष्ट्राचे खरे बळ असून त्यांचे प्रश्न सोडवणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. शेतकरी चळवळीत एकजूट राखून कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी माजी सरपंच उज्वल ( काका) कदम, वैजनाथ कुंभार, राहुल राजपूत, विवेक भारती, कुंदन राजपूत, दत्ता भालकडे, अजय कदम, यशवंत पाटील, हावाप्पा वाले, चंदन राजपूत, अविनाश क्षीरसागर, अजित क्षीरसागर, संजय भारती, कुलदीप राजपूत, बालाजी जावळे, नागनाथ कुंभार, बाबासाहेब भालकडे, नानाजी कदम, उज्वल कदम, शिवाजी कदम, अनिरुद्ध क्षीरसागर, मंगेश कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!