धाराशिव
लोहारा : नवरात्रोत्सवात भव्य मोफत आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

लोहारा/प्रतिनिधी
नवरात्र महोत्सवानिमित्त स्वस्थ नारी सशक्त परिवार या उपक्रमांतर्गत स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय लोहारा, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय लोहारा व श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा शहरातील जगदंबा मंदिर येथे दि. 28 सप्टेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन जगदंबा देवीच्या पूजन व आरतीनंतर माजी मंत्री तथा भाजप लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प. सदस्य तथा भाजप एससी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरीदास, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जगदंबा मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जगदीश बनसोडे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प समन्वयक रमाकांत जोशी, डॉ. आम्लेश्वर गारठे, नगरसेविका व भाजप महिला आघाडी तालुकाध्यक्ष आरती सतिश गिरी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शब्बीर गवंडी, गटनेत्या सारिका बंगले, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख, नगरसेविका कमल भरारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हरी लोखंडे, नगरसेविका सुमन रोडगे, नगरसेविका आरती कोरे, नगरसेविका संगिता पाटील, नगरसेवक जालिंदर कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते.




