जेवळी येथील कोरे कुटुंबियांचे आमदार चौगुले यांच्याकडून सांत्वन

 

लोहारा : जेवळी (ता लोहारा) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, जेवळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक व्ही. आय. कोरे गुरुजी यांचे शुक्रवारी (ता.चार) सोलापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले आहे. शिक्षण क्षेत्रात व एकत्र कुटुंब पद्धतीसाठी त्यांचा मोठा आदर्श होता. रविवारी (ता.सहा) सकाळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कोरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांतवण केले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा जेवळीचे सपंच मोहन पणुरे, शाखा अभियंता राजेंद्र माळी, पंचायत समितीचे माजी उपसभापती व्यंकट कोरे, प्रभूराज पणुरे,गुणवंत ढोबळे,श्रीमंत ढोबळे ,शिवराज चिंनगुंड्डे, पत्रकार बसवराज होनाजे, दत्तात्रय काळे याबरोबरच कोरे कुटुंबातील सदस्य सुभाष कोरे, सिद्धेश्वर बँकेचे (लातूर) निवृत्त वसुली अधिकारी श्रीशैल्य कोरे, नोटरी वकील ॲड सुनील कोरे, पत्रकार सुधीर कोरे, शिक्षक शशिकांत कोरे, कृषी सहाय्यक सतीश कोरे आदींची उपस्थिती होते.

 

 

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!