जेवळी येथील कोरे कुटुंबीयांचे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांच्याकडून सांत्वण

लोहारा : जेवळी (ता लोहारा) येथील श्री बसवेश्वर माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, जेवळी एज्युकेशन सोसायटीचे संचालक (कै) व्ही आय कोरे गुरुजी यांचा शुक्रवारी (ता.चार) सोलापूर येथे खाजगी दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले आहे. शिक्षण क्षेत्रात व एकत्र कुटुंब पद्धतीसाठी त्यांचा मोठा आदर्श होता. सोमवारी (ता.७) सायंकाळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांनी कोरे कुटुंबीयांची भेट घेऊन सांतवण केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, नितीन पाटील (उमरगा), मुरुम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शामसुंदर तोरकडे, जेवळी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्रीशैल ढोबळे, शालेय समिती सभापती ईराप्पा डिग्गे,गुणवंत ढोबळे, श्रीमंत ढोबळे , पंचायत समितीचे माजी सभापती बुद्धीवन साखरे, माजी उपसभापती व्यंकट कोरे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष मल्लिनाथ वल्लवडे, निवृत्त शिक्षक श्रीशैल कारभारी, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गाडेकर गोविंद जेवळीकर, उमरगा जनता सहू बँकेचे व्यवस्थापक शिवानंद चवले, राजु मुल्ला, रोहित कारभारी, दस्तगीर बेग याबरोबरच कोरे कुटुंबातील सदस्य सुभाष कोरे, सिद्धेश्वर बँकेचे (लातूर) निवृत्त वसुली अधिकारी श्रीशैल्य कोरे, नोटरी वकील ॲड सुनील कोरे, पत्रकार सुधीर कोरे, शिक्षक शशिकांत कोरे, कृषी सहाय्यक सतीश कोरे आदीं उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!