नवप्रभा महिला प्रभागसंघ संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न

लोहारा ( उस्मानाबाद ) : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा अंतर्गत जेवळी येथील नवप्रभा महिला प्रभागसंघ संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा लोहारा तालुक्यातील जेवळी उत्तर श्री.गंगाधर मठ येथे संपन्न झाली.

सदर सभेच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवप्रभा महिला प्रभागसंघाचे दूरदृष्टी विधान “प्रभागसंघाचा एकच नारा सक्षम महिला सुखी परिवार आदर्श गाव सारा” चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर सभेमध्ये आर्थिक वर्ष 2021-22 चे लेखापरीक्षण लेखापाल यांच्या मार्फत वाचन करण्यात आले.आज पर्यंतची CLF ची वाटचाल खर्च व उत्पन्न व उपक्रम याविषयीची माहितीची लेखापाल यांनी वाचन केले. तसेच सदर सभे करिता विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांना देण्यात आला यामध्ये शेतकरी लाभार्थी महिलांना ज्वारी व हरबरा बियाणे बॅगचे वाटप तालुका कृषी कार्यालय यांच्या मार्फत करण्यात आले.

तसेच आत्मा विभाग मार्फत 100 महिलांना पोषण बाग बियाणे किट वाटप करण्यात आले. सामाजिक वनीकरण तालुका लोहारा यांच्या मार्फत 1000 फळझाडे व इतर झाडांची रोपे वाटप करण्यात आली.लोहारा येथील ग्रामीण रुग्णालय,स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर व प्राथमिक आरोग्य केंद्र जेवळी व नवप्रभा प्रभागसंघ जेवळी यांच्या मार्फत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 490 महिलांचे हायपर टेन्शन (बीपी),शुगर,हिमोग्लोबिन (एच बी), तपासणी व निदान करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning

तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक, जेवळी मार्फत 20 गटांना 26 लाख व महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा आष्टा कासार मार्फत 12 गटांना 32 लाख रुपये असे एकूण 58 लक्ष बँक कर्ज मंजूर करण्यात आले.तसेच मुख्यमंत्री रोजगार योजना CMEGP अंतर्गत एकूण 6 महिलांना 7 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली.नवप्रभा महिला प्रभागसंघ संस्थेची पुढील वाटचाल याविषयी सचिव शीतल गायकवाड यांनी वाचन केले तसेच प्रभागात काम करणाऱ्या उत्कृष्ट समुदाय संसाधन व्यक्ती, ग्रामसंघ,उत्पादक गट,उत्कृष्ट सहकार्या बाबत बँक व ग्रामपंचायत यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी गट विकास अधिकारी शीतल खिंडे यांनी ग्रामीण भागातील महिलांनी रेशीम उद्योगाची निवड करून आपली आर्थिक प्रगती करण्याचे अवाहन केले,तसेच गटातील महिलांनी स्वतची ओळख निर्माण करावी व विविध शासकीय योजनाचे लाभ घेऊन प्रगती करावी असे अवाहन केले.
सदर सभेस गटविकास अधिकारी शीतल खिंडे, आत्मा विभागाचे प्रकल्प संचालक जे.पी.शिंदे सर,रेशीम तांत्रिक अधिकारी श्री.प्रताप घुटे,जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ.बलविर मुंडे,जिल्हा समन्वयक कृतीसंगम गोरक्षनाथ भांगे,जिल्हा व्यवस्थापक ज्ञान व विपणन समाधान जोगदंड,अमित तिगोटे,आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक लोहारा कैलास पवार,आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक तुळजापूर वैभव लोंढे,सामाजिक वनीकरण तालुका व्यवस्थापक श्री.बालाजी मुडळे सर MREGS चे थोरात ,महाराष्ट्र ग्रामीण बँक आष्टा कासार येथील शाखा व्यवस्थापक श्री.आशिष बनसोडे,महाराष्ट्र ग्रामीण बँक जेवळी येथील शाखा प्रतिनिधी जावेद पटेल,स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.वैशाली जाधव ,उज्वल कारभारी ,ग्रामीण रुग्णालय लोहाराचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल मगर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक कार्यक्रमास उपस्थित होते.तसेच प्रभाग संघाचे अध्यक्ष,विठाबाई मडोळे,सचिव शीतल गायकवाड,कोषाध्यक्ष प्रियंका जाधव व प्रभागसंघ तसेच गटातील महिला सदस्य बहुसंखेने उपस्थित होते.


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक श्री अलंकार बनसोडे यांनी केले सूत्रसंचालन राहुल मोहरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री अविनाश चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रम करिता श्री अमोल कासार, शिवशंकर कांबळे, श्रीमती प्रणिता कटकदौंड, माधुरी माळी, प्रीतम बनसोडे, अन्तेश्वर माळी,किशोर हुडेकर,प्रदीप लोंढे, नंदन थोराथ, सचिन गायकवाड, माधुरी मुळे, कल्पना शिंदे,कविता पवार,उमादेवी चवले व सर्व समुदाय संसाधन व्यक्ती यांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!