मार्डी येथे तुती, फळबाग लागवड अभियान अंतर्गत मार्गदर्शक

लोहारा (उस्मानाबाद ) : लोहारा तालुक्यातील मार्डी येथे तुती लागवड ,फळबाग लागवड अभियान अंतर्गत तहसीलदार संतोष रुईकर यांनी सोमवारी भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी करजखेडा येथील तुती लागवड लागवड केलेले शेतकरी गणेश आदटराव यांनी रेशीम तुती लागवडी मधून जीवनमान कसे उंचावता येईल व कायमस्वरूपी पीक पद्धत बदलून तुती लागवड मधूनही जास्तीचे उत्पन्न घेऊन जीवनमान कसे उनचा विता येते व त्याची कार्य पद्धती विषयी माहिती दिली. तहसीलदार संतोष रुईकर यांनी तुती लागवड फळबाग लागवड विषयी जनजागृती करून माहिती सांगितली व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड फळबाग लागवड अर्ज सादर करून लाभ घ्यावा असे अवाहन शेतकऱ्यांना तहसीलदार संतोष रुईकर यांनी केले.
यावेळी अण्णासाहेब पाटील, ग्रामसेवक एफ.आय. सय्यद, एपीओ घुटे,पाटील एपीओ श्रीकांत थोरात, अधिकारी शेख, वजीर मनीयार, ग्रामरोजगार सेवक रमेश कदम यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.