धाराशिवमहाराष्ट्र

उमरगा : जनसुरक्षा कायदा रद्द करा – महाविकास आघाडी आक्रमक!

उमरगा (दि. १० सप्टेंबर २०२५) :
महाराष्ट्र शासनाने नुकताच मंजूर केलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात आज उमरगा येथे महाविकास आघाडी आक्रमक झाली. आमदार प्रवीण स्वामी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने नेते व कार्यकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत या कायद्याला जोरदार विरोध दर्शविला.

निवेदनात स्पष्ट करण्यात आले की –
➡️ हा कायदा लोकशाही मूल्ये व संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणणारा आहे.
➡️ अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभा, मोर्चा आणि आंदोलन यांवर थेट बंधने येण्याची शक्यता.
➡️ शासनाविरोधात आवाज उठवणाऱ्या निष्पाप नागरिकांवर कारवाईचा धोका.
➡️ त्यामुळे लोकशाही व्यवस्थेलाच गंभीर धोका निर्माण होईल.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठाम इशारा दिला की –

“लोकशाही तत्त्वांचे रक्षण आणि जनहित लक्षात घेता हा कायदा तातडीने रद्द करावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल.”


✊ कोण होते उपस्थित?

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते डॉ. अजिंक्य बापू पाटील
अॅड. इनामदार
जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना विजयकुमार नागणे
सुधाकर पाटील, आप्पाराव गायकवाड, भगवान जाधव, मारुती थोरे
सतीश जाधव, तुकाराम पाटील, रणधीर पवार, धीरज बेळमकर
वहाब अत्तार, पवन त्रिमुखे आदी मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.


 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!