धाराशिवमहाराष्ट्रराजकीय
“धरण भरलं, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबले नाहीत – अनिल जगतापांची सिंहगर्जना : ‘जमीन संपादित करू देणार नाही’”

लोहारा : खेड (ता. लोहारा) येथे शेतकऱ्यांची मोठी सभा पार पडली. मंचावरून अनिल जगतापांनी जाहीर इशारा दिला – “धरणाची उंची वाढवण्यासाठी एक इंचही जमीन सरकार घेणार नाही, शेतकरी देणार नाही.”
1989 मध्ये निर्माण झालेल्या निम्न तेरणा प्रकल्पाची क्षमता गाळ साचल्याने 121 वरून 85 दशलक्ष घनमीटर इतकीच उरली आहे. तरीदेखील शासनाने 22 ऑगस्ट रोजी 190 कोटींच्या बेलकुंड उपसा सिंचन योजनेला मान्यता दिली. आधीच लोहारा, उमरगा, औसा तालुक्यांचा पाणीपुरवठा व लोकमंगल कारखान्याचे आरक्षण या धरणावर आहे. परिणामी एकूण मागणी 140 दशलक्ष घनमीटरवर पोहोचली आहे, पण क्षमता फक्त 85 आहे.




