लोहारा | प्रतिनिधी
“जिद्द, मेहनत आणि स्वप्नावरचा विश्वास यशस्वी होण्यासाठी किती महत्त्वाचा असतो याचा जिवंत नमुना म्हणजे गजगौरी सूर्यवंशी जाधव” – अशा शब्दांत सर्वत्र कौतुक होत आहे.
लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील सुरेखा विजयकुमार सूर्यवंशी यांची कन्या व सध्या पुण्यात कार्यरत असलेल्या सौ. गजगौरी नितीन जाधव यांनी महाराष्ट्र व गोवा राज्यातील सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेली SET परीक्षा (15 जून 2025) वाणिज्य विषयात उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश संपादन केले. या अगोदरही त्यांनी ग्रंथालय व माहितीशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन यशाची नोंद केली होती.

त्यांचे शिक्षण प्रवासही तितकाच प्रेरणादायी आहे. लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातून पदवी, त्यानंतर भारतीय जैन संघटना, वाघोली (पुणे) येथून उच्च शिक्षण आणि सध्या त्याच महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत. छोट्या गावातून सुरू झालेली ही वाटचाल आज विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
गजगौरींच्या यशाबद्दल प्रबंध समिती सदस्य श्री. सुरेश साळुंके, प्राचार्य डॉ. संजय गायकवाड, प्राचार्य संतोष भंडारी, प्राचार्य डॉ. दिलीपकुमार देशमुख, मुख्याध्यापक संजय जाधव, पुणे विद्यापीठाचे डॉ. राजेंद्र कुंभार, प्रा. महादेव नरवडे, डॉ. लिंबाजी प्रताळे, प्रा. कोटरंगे सर, प्रा. विश्वास हसे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनापासून अभिनंदन केले.
त्यांचे सासर मोघा बू येथे असून त्या नितीन दगडू जाधव यांच्या पत्नी आहेत. गाव, महाविद्यालय आणि संपूर्ण परिसर या यशाने भारावून गेला असून “गजगौरीचे यश म्हणजे केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर ग्रामीण भागातील मुलींनाही उच्च शिक्षणाच्या संधी खुल्या आहेत, याचा पुरावा आहे” अशी भावना व्यक्त होत आहे.
Back to top button
error: Content is protected !!