सामाजिकधाराशिवमहाराष्ट्र
यंदाचे प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार जाहीर
डॉ. दामोदर पतंगे – जीवन गौरव, वसंतराव नागदे – सहकाररत्न, डॉ. दीपक पोफळे – समाजरत्न, अनिल जगताप – कृषीरत्न; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

उमरगा (प्रतिनिधी) : ज्ञानप्रेमी, विचारवंत आणि वाचनसंस्कृतीचे अध्वर्यू प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी प्रदान होणाऱ्या “स्मृती गौरव पुरस्कारांची” यंदाची घोषणा ६ सप्टेंबर रोजी मुळज येथे करण्यात आली.
सन २०१८ साली स्थापन झालेल्या वाचनालयाच्या माध्यमातून उमरगा-लोहारा परिसरात वाचनाची नवी क्रांती उभी राहिली आहे. “पान टपरी नव्हे, ज्ञान टपरी” या ब्रीदाखाली सुरू झालेल्या वाचन टपऱ्या, हेअर सलून-टी स्टॉलवरील वाचन कट्टे, मकरसंक्रांतीला पुस्तकांचे वाण, गुढीपाडव्याला पुस्तकगुढ्या, गणेशोत्सवात वाचनशील गणपती, दसऱ्याला विवेकयात्रा अशा उपक्रमांनी वाचनाची मशाल पेटवली आहे.
पुरस्कारांची परंपरा
या वाचनालयाच्या वतीने २०१९ पासून दरवर्षी “प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार” दिला जातो. प्रा. चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त म्हणजेच ६ सप्टेंबर रोजी पुरस्कार जाहीर होतात, तर डिसेंबर महिन्यात भव्य सोहळ्यात वितरण केले जाते.
यंदाचे विजेते कोण?
यंदा जाहीर झालेले पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत :
-
जीवन गौरव पुरस्कार – डॉ. दामोदर पतंगे, गुंजोटी
-
समाजरत्न पुरस्कार – डॉ. दीपक पोफळे, उमरगा
-
कृषीरत्न पुरस्कार – अनिल जगताप, भातागळी (ता. लोहारा)
-
उद्योगरत्न पुरस्कार – सतीश बाबूराव पवार, नाईचाकूर
-
शिक्षकरत्न पुरस्कार – रामजी सोळुंके, माडज
-
सहकाररत्न पुरस्कार – वसंतराव नागदे
-
ग्रंथसेवा पुरस्कार – सौ. भाग्यश्री औरादे, कदेर
-
संगीतरत्न पुरस्कार – गौरी कांबळे, कसगी
-
उत्कृष्ट वाचक पुरस्कार – महादेव शिंदे, तुगाव
-
पत्रकाररत्न पुरस्कार – बालाजी बिराजदार, लोहारा
-
कला रत्न पुरस्कार – विशाल कानेकर, तुरोरी



