लोहारा/प्रतिनिधी
लोहारा पोलीस ठाण्यात दि. 4 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता श्री गणरायाची आरती लोहारा शहरातील पत्रकारांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात भाविकांनी गणेश आरतीत सहभाग नोंदवला.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, अशोक दुबे, जसवंतसिंह बायस, इकबाल मुल्ला, आब्बास शेख, यशवंत भुसारे, गणेश खबोले, सुमित झिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच पोलीस अंमलदार अर्जुन तिगाडे, आकाश भोसले, निरंजन फुलमाळी, माधव कोळी, सुनील पवार, कांतु राठोड, महिला पोलीस अंमलदार मिना पोटे, शिवकांता भिसे, होमगार्ड बिलाल गवंडी, महिला सफाई कर्मचारी पमाबाई पवार यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून आरतीचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे पोलीस व पत्रकार यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.