लोहारा (प्रतिनिधी) : सार्वजनिक गणेश मंडळ, क्रांती चौक सास्तूर यांच्या वतीने कै. नहूष राहुल दादा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे आज दि. १ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
HTML img Tag

या शिबिरात तब्बल १०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष सुमित क्षीरसागर, उपाध्यक्ष शांतेश्वर शिंदे, मा. सरपंच विजयकुमार क्षीरसागर, आनंदराव हासुरे, ओमकार मोरे, भाऊसाहेब आंबेकर, गंगाधर पवार, तसेच पाटील परिवारातील राजवर्धन पाटील, रणजीत पाटील, अजय पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह गोविंद यादव, रमेश भुरे, सहदेव माळी, नेताजी पवार, समीर पवार, किशोर स्वामी, वीरेंद्र पवार, विश्वास पूर्णे, शुभम देशमुख, उमेश देशमुख, गिरीश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे कै. नहूष राहुल दादा पाटील यांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली गेली असून रक्तदान शिबिराबद्दल नागरिकांकडून कौतुकाची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Back to top button
error: Content is protected !!