धाराशिव

लोहारा पोलीस स्टेशनतर्फे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद पार्श्वभूमीवर रूट मार्च

लोहारा : आगामी गणेशोत्सव तसेच ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर आज लोहारा पोलीस स्टेशनच्या वतीने लोहारा, माकणी व जेवळी येथे रूट मार्च (पथसंचलन) करण्यात आले. यामध्ये एसआरपीएफ प्लाटून, स्थानिक पोलीस तसेच होमगार्डचा सहभाग होता.

सण काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे पथसंचलन घेण्यात आले.

 

HTML img Tag Simply Easy Learning

नागरिकांना आवाहन
सण मिरवणुका शांततेत पार पाडाव्यात. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. मिरवणुका डीजे मुक्त ठेवून पारंपरिक वाद्यांसह काढाव्यात. तसेच दिलेल्या वेळेचे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!