
जेवळी (ता. लोहारा) : जेवळी येथील दगडी चाळ गणेश मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत आयोजित रक्तदान शिबिरास गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ११३ रक्तदात्यांनी सहभाग घेतला असून यात युवकांसह महिलांचाही मोठा सहभाग होता.
शुक्रवारी (ता. २९) पार पडलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्र, माजी उपसरपंच भोजाप्पा कारभारी, बीट अंमलदार कान्तु राठोड, अक्षय ब्लड सेंटरचे डॉ. प्रवीण नरवटे, जनसंपर्क अधिकारी अजय रुपनर, कमलाकर बिराजदार, मल्लिनाथ सुतार, महादेव मोघे, उदय कुलकर्णी यांच्यासह गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन निंबाळे, उपाध्यक्ष विक्रांत बिराजदार, सचिव रविराज कारभारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर येथील अक्षय ब्लड सेंटरने रक्त संकलन केले.
या उपक्रमात प्रदीप कारभारी व त्यांच्या कुटुंबातील चौघांनी सामूहिक रक्तदान करून विशेष योगदान दिले.
गणेश मंडळाच्या सामाजिक उपक्रमांतर्गत बसवेश्वर विद्यालयातील दहा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाज प्रबोधनकार डॉ. वसंत हंकारे यांचे व्याख्यान मंगळवारी (ता. २) आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती गणेश मंडळाचे कार्यकर्ते पृथ्वीराज कारभारी यांनी दिली आहे.
Back to top button
error: Content is protected !!