महाराष्ट्रधाराशिव

मराठा आरक्षण लढ्यास उमरगा-लोहारा व धाराशिवच्या जनप्रतिनिधींचा ठाम पाठिंबा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाला धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, उमरगा-लोहारा तालुक्यांचे लोकप्रिय आमदार प्रवीण स्वामी, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास दादा पाटील, आमदार अभिजीत पाटील तसेच युवा नेते डॉ. अजिंक्य बापू पाटील यांनी भेट देत ठाम पाठिंबा दर्शविला.

नेत्यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि मराठा समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्यास पूर्ण साथ देण्याची ग्वाही दिली. “मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष नक्कीच यशस्वी होवो,” अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

या भेटीमुळे मराठा समाजाच्या आंदोलनाला राजकीय पातळीवर अधिक बळ मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!