
धाराशिव (ऑगस्ट २०२५) : जिल्हा परिषद धाराशिव व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात **‘विनोबा(बा) ॲप’**च्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो. या अंतर्गत जुलै महिन्यातील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलवाडी (ता. लोहारा) येथील शिक्षक मल्लिकार्जुन कलशेट्टी व जिल्हा परिषद शाळा पाथरुड (ता. भूम) येथील भुर्के डी.जी. (पोटरे) यांना पुरस्कार व लायब्ररी बॅग देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळवडी (ता. भूम) येथील श्री. माधव पोटारे यांनाही लायब्ररी बॅग प्रदान करून गौरव करण्यात आले.
हा सन्मान सोहळा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. नागेश मापारी यांच्या हस्ते पार पडला. या वेळी ओपन लिंक्स फाउंडेशनचे सोमनाथ स्वामी व मुजावर शेख उपस्थित होते.
लायब्ररी बॅग ही विनोबा ॲप मधील शिक्षक अवॉर्ड अंतर्गत बुकिंगद्वारे प्राप्त करण्याची सोय उपलब्ध आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
शिक्षणाधिकारी श्री. मापारी यांनी विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन करून जिल्ह्यातील इतर सर्व शिक्षकांनीही या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अधिक कार्यक्षमतेने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Back to top button
error: Content is protected !!