महाराष्ट्र
वडाळे तलावावर दीड दिवस गणरायाचे विसर्जन भक्तिभावात – आमदार विक्रांत दादा पाटील यांची उपस्थिती

पनवेल : गणेशोत्सवातील दीड दिवस गणरायाच्या विसर्जनाचा सोहळा वडाळे तलावावर मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. सकाळपासूनच भाविकांचा मोठा जनसागर विसर्जनासाठी जमा झाला होता. ढोल-ताशांच्या निनादात, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात, गुलालाच्या उधळणीत आणि टाळ-करतालांच्या नादात परिसर गणेशमय झाला होता.

या सोहळ्याला आमदार विक्रांत दादा पाटील यांनी उपस्थित राहून भाविकांना भेट दिली. त्यांनी नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. “लोकांच्या प्रश्नांना सकारात्मक तोडगा काढण्यासाठी मी सदैव तत्पर आहे,” असे आश्वासन दादांनी यावेळी दिले. नागरिकांनीदेखील गणेशोत्सवात राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती आमदारांना दिली.





