लोहारा (जि. धाराशिव): मराठा संघर्ष योद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोहारा तालुक्यातील मराठा समाजबांधव आज उत्साहाच्या लाटेत मुंबईकडे रवाना झाले.
प्रस्थानावेळी “चलो मुंबई… चलो मुंबई…”, “एक मराठा, लाख मराठा”, तसेच “जो घरी बसला, तो मराठा कसला” अशा जोशपूर्ण घोषणांनी वातावरण भारून गेले. बस, गाड्या व ताफ्यांसह निघालेल्या आंदोलकांनी ठिकठिकाणी हातात भगवे झेंडे व बॅनर घेऊन संघर्षाची जाज्वल्य शपथ घेतली.
मुंबईतील आझाद मैदानावर लाखो मराठा बांधवांची उपस्थिती दाखवून आरक्षणाच्या लढ्याला निर्णायक वळण देण्याचा निर्धार लोहाऱ्यातून निघालेल्या बांधवांनी व्यक्त केला. युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंदोलनाला विशेष उर्जा मिळाली आहे.
“आरक्षण मिळेपर्यंत लढा थांबणार नाही” हा एकच संकल्प घेऊन लोहाऱ्याचे मराठा समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत.