उमरगा दि. २८: अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण स्वामी यांनी आज डिग्गी, बेडगा आणि जहागीर चिंचोली या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यांनी तात्काळ पंचनामे करून शासनाकडून तातडीची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
HTML img Tag

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे, तर काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना, “हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला,” अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, “मी तुमच्यासोबत आहे. या नुकसानीची माहिती मी थेट मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांना देणार आहे. लवकरच पंचनामे सुरू केले जातील आणि तुम्हाला तातडीने मदत मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे.” त्यांच्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
यावेळी माचन्ना एस ए मंडळ अधिकारी
पी एस भोसले कृषी मंडळ अधिकारी
आर डी पाटील कृषी सहाय्यक
पी एस आष्टे ग्राम महसूल अधिकारी बेडगा एस एस सगर ग्राम महसूल अधिकारी डिग्गी, विजयकुमार नागणे, सुधाकर पाटील, दत्तात्रय शिंदे ,चंद्रकांत माने, सुनिल माने बालाजी माने, गोपाळ माने राहुल गावडे मलिंनाथ सोंडे, सुरेश कुंभार, किरण जमादार, तानाजी माने, धोडू ठाकूर, नितीन ठाकूर,गावचे सरपंच, उपसरपंच, तसेच स्थानिक पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!