धाराशिव

लोहारा तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत न्यू व्हिजन स्कूलच्या भाग्यश्री व श्वेताची बाजी

लोहारा : दिनांक २६ ऑगस्ट रोजी लातूर विभाग व धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धा लोहारा येथील सद्गुरू क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या फ्री स्टाइल कुस्ती गटात लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली.

३० किलो वजन गटात इयत्ता ६ वीतील कु. भाग्यश्री दादासाहेब रवळे हिने तर ४० किलो वजन गटात कु. श्वेता रामेश्वर कार्ले हिने समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करत प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी लोहारा तालुका क्रीडा अधिकारी श्री. मुकेश सोमवंशी, परीक्षक श्री. गोविंद घारगे, श्री. गोपाळ सुतार, वस्ताद श्री. दयानंद दादा साळुंके, शिवाजी कार्ले, मेलघर वस्ताद, खंडेराव कस्तुरे तसेच पालक व मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलतर्फे भाग्यश्री व श्वेताचे अभिनंदन करण्यात आले असून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!