धाराशिवशैक्षणिक

लोहाऱ्याचे रसूल शेख ‘गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

लोहारा / प्रतिनिधी

जिल्हा अल्पसंख्यांक सहकारी पतसंस्था, धाराशिव तर्फे यंदाच्या गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी लोहारा तालुक्यातील श्री. रसूल शेख यांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कार वितरणाचा सोहळा उद्या, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव येथील कन्या प्रशालेत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी आमदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), शिक्षणाधिकारी साहेब, डाएट प्राचार्य तसेच अन्य मान्यवर पाहुण्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

श्री. रसूल शेख यांनी शिक्षक म्हणून कार्यरत राहून शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे लोहारा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!