लोहारा (प्रतिनिधी) लोहारा शहरातील शिवनगर येथील श्री. शिव गणेश मित्र मंडळाची गणेशोत्सव २०२५ साठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी महेश पाटील यांची, उपाध्यक्षपदी शुभम गोसावी, तर कोषाध्यक्षपदी शिवकुमार बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
श्री. मारुती मंदिर, शिवनगर येथे रविवारी (दि. ३ ऑगस्ट) मंडळाचे आधारस्तंभ अमोल बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत एकमताने कार्यकारणी निवडून देण्यात आली.
उर्वरित पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत – सहकोषाध्यक्ष : किशोर माळी मिरवणूक प्रमुख : प्रकाश लोखंडे, संदीप पाटील, शुभम माळी, सुरज मुळे, अभिजीत माळी प्रसिद्धी प्रमुख : चेतन माळी
यावेळी सदस्य म्हणून महेश बिराजदार, ओमकार बिराजदार, धीरज माळी, विलास लोखंडे, शिवराज शिवरे, योगेश बिराजदार, विष्णू माळी, धनंजय दरेकर, आप्पा साखरे, सचिन भरारे, संजय दरेकर, आप्पास दरेकर, राम चपळे, आप्पा लोखंडे, कमलाकर मुळे, अविनाश मुळे, राजेंद्र माळी, संतोष माळी आदींची उपस्थिती होती.
मंडळाने यंदा उत्सव अधिक भव्य आणि सामाजिक उपक्रमांनी परिपूर्ण करण्याचा संकल्प केला असून, लवकरच सार्वजनिक कार्यक्रमांची रूपरेषा जाहीर केली जाणार आहे.