लोहारा तालुक्यातील ३ पुलांच्या कामासाठी ५ कोटी ९० लक्ष रुपये मंजूर आमदार चौगुले यांची माहीती

उस्मानाबाद : लोहारा तालुक्यातील ३ पुलांच्या कामासाठी नाबार्ड २८ अंतर्गत ५ कोटी ९० लक्ष रुपये मंजूर झाले असल्याची माहीती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मंगळवारी १४ डिसेंबर रोजी प्रसिध्दी पञकाव्दारे दिली आहे.
लोहारा तालुक्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ३ पुलांच्या कामांसाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून नाबार्ड २८ योजनेअंतर्गत ५ कोटी ९० लक्ष रुपये निधी मंजुर झाला आहे. यामध्ये रामा २११ ते आष्टा कासार ते जिल्हा सरहद्द प्रजिमा ४६ रस्त्यावर (आष्टा कासार गावाजवळ) लहान पुलाचे बांधकाम करणे १ कोटी २० लक्ष रुपये ,रामा २११ ते कारभारी वस्ती ते नागुर रस्ता ग्रा.मा.१६ रस्त्यावर लोहारा खु. गावाजवळ (द्वारका नदीवर) पुलाचे बांधकाम करणे २ कोटी रुपये, प्रजिमा ४५ ते हिप्परगा सय्यद हराळी उदतपुर इजिमा १०० रस्त्यावर (तावशीगड गावाजवळ) पुलाचे बांधकाम करणे २ कोटी ७० लक्ष रुपये या कामांचा समावेश आहे. अशी माहीती आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली आहे. सदर महत्वाच्या पुलांच्या कामांसाठी मंजुरी दिल्याबद्दल आमदार ज्ञानराज चौगुले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.