लातुर येथे शिक्षणासाठी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्याची मतदार नोंदणी सुरु

उस्मानाबाद : 2023 च्या मतदार यादीच्या वार्षिक पुनरिक्षणाच्या सध्याच्या फेरीसाठी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 जानेवारी 2024 पर्यंत 18 वर्षे पूर्ण करणारा कोणताही नागरिक मतदार यादीचे प्रारूप प्रकाशन प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून मतदार म्हणून नोंदणीसाठी आगाऊ अर्ज सादर करू शकतो.
त्या अनुषंगाने उस्मानाबादचे जिल्हाधिकारी श्री सचिन ओंबासे यांनी एक वेगळा उपक्रम राबवून तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या अधिनस्त एक पथक तयार करून उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर या ठिकाणी महाविद्यालय व ट्युशन क्लासेस येथे शिकण्यासाठी जे 1 जानेवारी 2024 ला मतदार म्हणून पात्र विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी वरील पथक नेऊन लातूर येथून मतदान नोंदणी करण्यास सुरुवात झालेली आहे सदरील मतदार नोंदणी पथकास चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे दिनांक ऑगस्ट पासून 11 ऑगस्टपर्यंत ही मोहीम लातूर येथे राबवली जात आहे त्यामध्ये पथक प्रमुख म्हणून लोहारा तहसीलदार श्री प्रसाद कुलकर्णी उमरगा येथील नायब तहसीलदार श्री केलूरकर तुळजापूर तहसील येथील अवलकारकून बालाजी चामे मंडळ अधिकारी व इतर तलाठी कर्मचारी असे एकूण 15 कर्मचाऱ्यांचे पथकामार्फत नवीन मतदार नोंदणी चालू आहे.