लोहारा | २ जुलै २०२५
आज वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय, लोहारा येथे प्राचार्य श्रीमती उर्मिला पाटील मॅडम यांचा वाढदिवस अत्यंत अनोख्या आणि पर्यावरणपूरक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाने शिक्षणसंस्थेच्या परिसरात हिरवळ वाढवण्याचा संकल्प घेतला गेला.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य पाटील मॅडम यांचा औपचारिक सत्काराने करण्यात आली. श्रीमती पोर्णिमा घोडके मॅडम यांच्या हस्ते त्यांना शाल, फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात मॅडमचा गौरव केला.
त्यानंतर प्राचार्य उर्मिला पाटील मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या वाढदिवसाचा हा उपक्रम समाजासाठी एक प्रेरणादायक संदेश देणारा ठरला.
या कार्यक्रमाला शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच वृक्षारोपणामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अखेरीस प्राचार्य पाटील मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाचे महत्व पटवून देत वृक्षारोपणासारखे उपक्रम आयुष्यात आत्मसात करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामुळे संपूर्ण शैक्षणिक परिसरात हिरवळ निर्माण होण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी जाणीव निर्माण झाली आहे. समाजातही एक सकारात्मक संदेश गेल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Back to top button
error: Content is protected !!