महाराष्ट्र
वडगाव (गां.) येथील विमलबाई गायकवाड यांचे निधन

लोहारा ( जि. धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील वडगाव (गां.) येथील विमल बाबुराव गायकवाड यांचे पुण्यात शनिवारी (दि. ७) सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या ७० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता बिबवेवाडी, पुणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
विमलबाई गायकवाड यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या डॉ. बी. पी. गायकवाड (माजी आरोग्य सहसंचालक, महाराष्ट्र शासन) यांच्या पत्नी व डॉ. एस. पी. गायकवाड (प्राचार्य, दयानंद कला महाविद्यालय, लातूर) यांच्या वहिनी होत.
त्यांच्या अचानक जाण्याने वडगाव गावात तसेच नातलग, मित्रपरिवार आणि समाजात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



