लोहारा (उस्मानाबाद ) : नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयातील प्रा.रामेश्वर शंकरराव धप्पाधुळे यांना लोकप्रशासन विषयात विद्यावाचस्पती ही पदवी प्रदान करण्यात आली.जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची गुणात्मक कार्य महाराष्ट्रातील लातूर जिल्हा एक अभ्यास या विषयावर डॉ. पी.एल. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधनाचे कार्य पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल डॉ.पी.एल. चव्हाण,प्राचार्य डॉ. व्हि. यु.पाटील यांच्यासह आदींनी अभिनंदन केले.