धाराशिव
राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

लोहारा ( धाराशिव ) : दिनांक -12 जानेवारी 2025 रोजी लोहारा येथील भारतमाता मंदिर याठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रा.स्व.संघ व जनकल्याण समिती संचलित भारतमाता मंदिर प्रकल्पाचे पूर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव, उत्तमराव पाटील, प्राचार्य शहाजी जाधव, प्रा.यशवंत चंदनशिवे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, दत्ताजी जावळे पाटील, रमेश वाघुले, अंबादास पोतदार, आदी मान्यवर उपस्थित होते.



