लातूर/प्रतिनिधी : स्प्रिंग डेल पब्लिक स्कूल हरंगुळ (बी.के.) येथे स्वामी विवेकानंद, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या स्मृती दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. नरसिंगजी आयलाने, शाळेचे सचिव श्री. विनोदजी जटाळ, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अमोलजी आयलाने, प्रमुख वक्त्या व शाळेच्या समन्वयक श्रीमती राजश्री आयलाने, तसेच मा.मुख्याध्यापक चव्हाण सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती राजश्री आयलाने यांनी राजमाता जिजाऊंच्या स्वराज्य स्थापनेतील योगदानावर भर देत, त्यांची दूरदृष्टी आणि शिवबांना घडवण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांवर थोडक्यात प्रकाश टाकला. तसेच, स्वामी विवेकानंदांच्या शिकागो भाषणाचा उल्लेख करत, त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभिमान जागवला आणि तरुणांना प्रेरणा दिली असे नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात श्री. नरसिंगजी आयलाने यांनी स्वामी विवेकानंद आणि जिजाऊंच्या नेतृत्वगुणांवर भाष्य केले व विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, संघटन कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीची शिकवण दिली. त्यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावरही प्रकाश टाकला. शास्त्रीजींचा साधा स्वभाव, प्रामाणिकता आणि “जय जवान, जय किसान” या घोषणेद्वारे त्यांनी दिलेला संदेश विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. शास्त्रीजींच्या साधेपणातून आणि त्यागातून आपण प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेली राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि लालबहादूर शास्त्री यांच्या वेशभूषेची सादरीकरणे. यात प्रांजल फुलमंटे, खरोसे स्वानंदी, सोनटक्के सिद्धी, आराध्या उडगे, वाघमारे देविका, उडगे परेदी, अधिरा वाघमारे, मणियार मरियम, वेदिका वाघमारे, सर्वज्ञा नकुलवाड, सानवी गुरमे, सई सोनटक्के आणि आरुषी वाघमारे यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. तेलंगे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी फुलमंटे यांनी केले. आभार श्री. खोत सर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता “वंदे मातरम्” या राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख श्रीमती किर्ती वाघमारे व सहप्रमुख कु. अपेक्षा उडगे व भोसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Back to top button
error: Content is protected !!