शैक्षणिक
स्प्रिंग डेल पब्लिक स्कूलमध्ये महापुरुष जयंती उत्साहात साजरी

हरंगुळ (बु), लातूर – ३० एप्रिल:
स्प्रिंग डेल पब्लिक स्कूल, हरंगुळ (बु) येथे महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. नरसिंगजी आयलाने, शाळेच्या समन्वयक श्रीमती राजश्री आयलाने आणि मुख्याध्यापक मा. तेलंगे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक श्री प्रवीण भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री मारुती खोत यांनी केले.
श्रीमती राजश्री आयलाने यांनी आपल्या भाषणातून बसवेश्वर महाराजांचे समाजसुधारणेतील योगदान तसेच तुकडोजी महाराजांचे ग्रामविकास आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांना प्रभावीपणे समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांनी भजन, भाषणे व लघुनाट्य सादर करत महापुरुषांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाच्या शेवटी कु. अपेक्षा उडगे हिने आभार प्रदर्शन केले. समारोप महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याच्या प्रतिज्ञेसह करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख श्रीमती कीर्ती वाघमारे, संगीत शिक्षक श्री तुकाराम आवाड, श्री पांचाळ सर, श्रीमती पांचाळ मॅडम व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.



