धानुरी (ता. लोहारा, जि. धाराशिव) | 11 एप्रिल 2025
महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र अंतर्गत धानुरी येथे दिनांक 11 एप्रिल रोजी महिलांसाठी आर्थिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम श्री नागनाथ लाड यांच्या निवासस्थानी पार पडला.
या कार्यक्रमाचे मार्गदर्शन श्री. सद्गुरू बबनजी महाराज (उंडरगांवकर) यांच्या पावन उपस्थितीत झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत मारुती महाराज महिला बचत गट, धानुरीचे सदस्य कार्यक्रमात उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या सौ. कविता संदीपान बनकर होत्या. कार्यक्रमाचे प्रभावी संचालन श्री. शिवहरी सूर्यवंशी यांनी केले, तर श्री. ज्ञानेश्वर झाडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वयं-सहायता गट, बचत गटांचे फायदे, सूक्ष्म अर्थसहाय्याच्या संधी तसेच आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व विषद करण्यात आले. महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेची भावना जागृत करून त्यांना स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता.
स्थानिक महिलांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, भविष्यात अधिकाधिक महिलांपर्यंत अशा उपक्रमांची पोच होण्यासाठी स्थानिक प्रशासन व महिला बचत गट सक्रिय राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Back to top button
error: Content is protected !!