धाराशिव
उंडरगावात घुंगराच्या साथी, संसाराची माती तीन अंकी नाटक, १४ एप्रिलला राधा पाटील

लोहारा / प्रतिनिधी : लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील नवसाला पावणारे ग्रामदैवत हनुमान जयंतीचे औचित्य साधून ११ ते १४ एप्रिल दरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रमांचा धुमधडाका सुरू असुन १४ एप्रिला रोजी रात्री ९ वाजता ऑर्केस्ट्रा डि जे शो राधा पाटील मुंबईकरांचा कार्येक्रम आयोजित केला आहे तरी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन उंडरगाव ग्रामस्थांनी केले आहे.
तालुक्यातील उंडरगाव हे कलेचे माहेरघर घर म्हटले तरी वावगे ठरणार नाही गेल्या अनेक दशकांपासून जय हनुमान यात्रेत नाटकांची परंपरा आज कायम आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दि १३ एप्रिल रोजी सकाळी हनुमान पालखी व शंभु महादेव कावड मिरवणूक त्यानंतर दुपारी दादा चव्हाण व दादा पाटील यांचा जुगलबंदी जंगी भारुड सामना रात्री ९ वाजता नाट्य रसींकासाठी सामाजिक व कौटुंबिक घुंगराच्या साथी, संसाराची माती हा तीन अंकी नाटक दाखविण्यात येणार असून या नाटकातील प्रमुख भूमिकेत ज्योती पेटकर नागपूर, कविता कदम वैराग , पेटी मास्तर निलेश वाघमारे तर तबला वादक शिराज पठाण , नाटकांचा प्रमुख सहभाग बालाजी सूर्यवंशी यांचा आहे. या काळात अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून लोहारा पोलिसांचा फौजफाटा तैनात असुन या धार्मिक कार्यक्रमांचा नाट्यरसिक व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन उंडरगाव ग्रामस्थ व यात्रा कमिटीने केले आहे.



