लोहारा : मौजे वडगांव (ता. लोहारा) येथील प्रसिद्ध शेतकरी व भजनी मंडळातील गायक कै. बाबुराव एकनाथ फुलसुंदर (माळी) यांचे दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 9 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ व मदतीस तत्पर होता. समाजातील सर्व स्तरातील लोकांशी सहज संवाद साधणारे, गरजूंच्या मदतीला धावून जाणारे, तसेच भजन गायन क्षेत्रात आपली खास ओळख निर्माण केलेले बाबुराव फुलसुंदर सर्वत्र “आबा” या नावाने प्रसिद्ध होते.
त्यांच्या अंतिम यात्रेस मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांच्या कार्यामुळे गावातील तसेच परिसरातील अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते नागेश फुलसुंदर यांचे वडील होत.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!