धाराशिवदेश -विदेश

जेवळीच्या अभियंता महेश ढोबळे यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर निवड

रो हाऊस विकणे आहे
वृंदावन रेसिडेंसी , बस स्टँड क्र 2 च्या बाजूला ,यशोदा मल्टिप्लेक्स समोर,अंबाजोगाई रोड,लातूर येथील ३ बी एच के सर्व सोई सुविधानी युक्त रो हाऊस क्र. १३ विकणे आहे.
प्लॉट एरिया -८८.२८ चौ.मी., कारपेट एरिया -८८.२८ चौ.मी.
संपर्क – डॉ गिराम , ९४२२९३५१९३,७६ ३५०१ ३५०१ .

 

(सुधीर कोरे, विशेष प्रतिनिधी)

जेवळी (ता. लोहारा) : येथील अभियंता महेश माणिक ढोबळे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. टेक्नीमॉंट गॅस प्रोसेस कंपनी (इटली) आणि ॲडनोक अबुधाबी नॅशनल ऑइल (संयुक्त अरब अमिराती) या संयुक्त भागीदारी असलेल्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांची व्यवस्थापक (प्लॅनिंग मॅनेजर) पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेतकरी कुटुंबातून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास

एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले महेश ढोबळे यांनी जिद्द, मेहनत आणि गुणवत्ता यांच्या जोरावर हा मोठा टप्पा गाठला आहे. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण श्री बसवेश्वर हायस्कूल, जेवळी येथे झाले. त्यांनी बारावी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथून पूर्ण केली. त्यानंतर प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेज, लोणी येथून बीई (मेकॅनिकल) आणि पुण्यातील निकमार महाविद्यालयातून एमबीए पूर्ण केले.

उद्योग क्षेत्रातील भरीव अनुभव

महेश ढोबळे यांनी यापूर्वी भारतातील नामवंत कंपन्यांमध्ये प्लॅनिंग मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी गॅम्मन इंडिया (छत्तीसगड), एल अँड टी महाजनको (नागपूर), एल अँड टी हायड्रोकार्बन (वडोदरा), तसेच रिलायन्स ऑइल अँड गॅस प्रोजेक्ट (जामनगर) या मोठ्या प्रकल्पांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या कौशल्याची दखल घेत आता त्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीत नियुक्ती झाली आहे.

अबुधाबीतील जबाबदारी

सध्या महेश ढोबळे टेक्नीमॉंट गॅस प्रोसेस आणि ॲडनोक अबुधाबी नॅशनल ऑइल कंपनीत प्लॅनिंग मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. या कंपन्या गॅस उत्खनन आणि प्रक्रिया क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांचा प्रमुख व्यवसाय इटलीसाठी गॅस पुरवठा करणे हा आहे. या प्रोजेक्टची एकूण किंमत जवळपास एक लाख कोटी रुपये आहे.

परिसरात आनंदाचे वातावरण

महेश ढोबळे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन केले आहे. त्यांच्या या प्रवासामुळे संपूर्ण लोहारा तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. शिक्षणाची मोठी पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी उच्च पद गाठून युवकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

——
(सुधीर कोरे, विशेष प्रतिनिधी)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!