लोहारा/उमरगा : आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत मौजे.भोसगा ता.लोहारा येथील अंबाबाई मंदिर व संत सेवालाल महाराज मंदिर समोर सभामंडप बांधणे 10 लक्ष रूपये व अल्पसंख्याक विकास निधि अंतर्गत कब्रस्थानास संरक्षक भिंत बांधणे असे एकुण 20 लक्ष रूपये निधी मंजुर केला आहे.
या कामांचे भूमिपूजन 15 ऑगस्ट रोजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी तालुक्यात केलेल्या विकास कामांसह मौजे.भोसगा येथे केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत शासनाने जाहिर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण व लाडका भाऊ सह इतर अनेक योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावें असे आवाहन केले.
यावेळी ग्रामस्थांनी महादेव मंदिरासमोर सभामंडप बांधणे व अवैद्य धंदे बंद करणे बाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे विनंती केली व मंजुर केलेल्या कामाबद्दल त्यांचें सत्कार करत आभारही मानले.
यावेळी लोहारा लोहारा शिवसेना तालुकाप्रमुख जगन पाटील, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, न.पं. अध्यक्षा वैशालीताई खराडे,लोहारा भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, माजी नगरसेवक अभिमान खराडे, सरपंच व्यंकट कागे, उपसरपंच सुभाष बिराजदार, ग्रा.पं.सदस्य सुलताना शहा, पोलिस पाटील ज्योती हत्तरगे, तंटामुक्ती अध्यक्ष चनबस बिराजदार, माजी सरपंच माणिक बिराजदार, माजी सरपंच शशिकला गोसावी, ग्रामसेवक इंगळे, विभागप्रमुख अमोल सोमवंशी, शिवराज चिनगुंडे, सुरेश दंडगुले, खंडू जाधव, आकाश पाटील आदी उपस्थित होते.
Back to top button
error: Content is protected !!