दक्षिण जेवळी येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन

सुधीर कोरे जेवळी,(ता लोहारा)
दक्षिण जेवळी (ता लोहारा) येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत जवळपास बावीस लक्ष रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन गुरुवारी (ता २९) जिल्हा परिषदेचे अतिरिक्त अधिकारी विलास जाधव यांच्या हस्ते पार पडले.
९३ च्या भूकंपानंतर जेवळीचे नागरिकांच्या सोयीनुसार जेवळी व दक्षिण जेवळी असे दोन ठिकाणी पुनर्वसन झाले या दोन्ही गावातील अंतर हे चार किलोमीटर आहे. विकासाबरोबरच दक्षिण जेवळी येथील नागरिकांना अनेक सोयी-सुविधा व गैरसोयींना तोंड द्यावे लागत असल्याने स्वतंत्र ग्रामपंचायतीचे मागणी होती. या ठिकाणी जवळपास तीन हजार लोकसंख्या आहे. यासाठी जवळपास वीस वर्षाच्या आंदोलन- लढ्या नंतर चार पाच वर्षांपूर्वी जेवळी ग्रामपंचायतीतून विभक्त होऊन दक्षिण जेवळी ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे. नव्याने ग्रामपंचायत स्थापित झाल्यानंतर येथील सोसायटी गोडाऊनची डागडुजी करून ग्रामपंचायत कार्यालय म्हणून वापरली जात होती. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी येथील ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील होते. यातून राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान २०१९-२० अंतर्गत जवळपास बावीस लक्ष रुपये मंजूर झाले होते. आता गावच्या मध्यभागी असलेल्या खुल्या जागेत ही इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्घाटन गुरुवारी (ता २९) जिल्हा परिषदेचे अतिरिक्त अधिकारी विलास जाधव यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या शोभाताई तोकडे या होत्या या प्रसंगी गटविकास अधिकारी सौ शितल खिंडे, सरपंच चंद्रकांत साखरे, बाजार समितीचे माजी संचालक शामसुंदर तोरकडे, निवृत्त कार्यकारी अभियंता अरविंद साखरे, उप अभियंता एम एन सरवदे, शाखा अभियंता आर.सी. चव्हाण, शाखा अभियंता आर आर संगमकर, विस्तार अधिकारी संजय ढाकणे, विनोद पवार, कनिष्ठ अभियंता एस पी बेले, एस जी पाटील, उपसरपंच पार्वती ग्राम विकास अधिकारी एम के बनशेट्टी, आर एन वाघमारे, माजी मुख्याध्यापक बी एम बिराजदार, दौलप्पा तोकडे, महादेव कारभारी, ग्रामपंचायत सदस्या विवेकानंद बिराजदार, राम मोरे, प्रविण बोंदाडेे, सुभाष कोरे, मनिषा कारभारी आदींची उपस्थित होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम के बनशेट्टी सुत्रसंचलन शामसुंदर तोरकडे यांनी केला.