दै. सकाळचे पत्रकार निळकंठ कांबळे यांनी पत्रकारिता क्षेत्रातील “आदर्श पत्रकार” पुरस्कार

उस्मानाबाद : साहित्यक्षेत्रातील कोहिनूर हिरा, ज्या साहित्यकाने फक्त दिड दिवसाची शाळा शिकून प्रचंड साहित्य निर्माण केले. ज्या साहित्यिकाचा रशियन सरकारने सुध्दा गौरव केला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणजेच साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे
येत्या ८ जानेवारी २०१३ रोजी, मौजे होळी, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद येथे एक दिवसीय साहित्यमस्राट अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होणार असून या साहित्यसंमेलनात विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण व्यक्तिमत्वांना पुरस्काराने गौरवित करण्यात येणार आहे.
याप्रसंगी दै. सकाळचे लोहारा शहरातील पत्रकार निळकंठ कांबळे यांचे पत्रकारिता क्षेत्रातील कार्य हे खरोखर अतुलनीय आहे. पञकार निळकंठ कांबळे हे दै. सकाळ या नामवंत दैनिकाचे पत्रकार असून श्री. कांबळे यांनी पत्रकारिता निर्भिडपणे करीत आले आहेत. पत्रकारिता कार्याचा गौरव म्हणून पत्रकार श्री. कांबळे यांना साहित्यसम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील आदर्श पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मा. श्रीपालजी सबनीस सर यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.