नागरिकांचे सशक्तिकरण व संपर्क अभियानानिमित्त लोहारा शहरात रॅली

नागरिकांचे सशक्तिकरण व संपर्क अभियानानिमित्त लोहारा शहरात रॅलीचे
लोहारा : लोहारा तालुका विधी सेवा समिती , भारतभर कायदेविषयक जनजागृती अभियाना अंतर्गत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाद्वारे नागरिकांचे सशक्तिकरण व संपर्क अभियानानिमित्त लोहारा शहरात शनिवारी 12 नोव्हेंबर रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅली तालुका न्यायालयापासुन प्रारंभ झाली. ते आझाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे परत न्यायालय अशी काढण्यात आली. या रॅलीमध्ये न्यायाधिश एन.एस.सराफ , न्यायाधिश कळसकर, पोलीस निरीक्षक अजित चिंतळे,अँड.दादासाहेब पाटील, अँड.अतुल कुलकर्णी,अँड. एस. आर. अडसुळे, अँड.रामदास जाधव, अँड. महेश जट्टे, अँड.संध्या तिगाडे, अँड.एस.एन. बादुले, अँड. मल्लिनाथ वचणे,अँड.देविदास जाधव,पोलीस माधव कोळी,न्यु व्हिजन स्कुलचे प्राचार्य शहाजी जाधव,
लोहारा हायस्कुलचे मुख्याध्यापक वसंत शेवाळे,प्रा.उध्दव सोमवंशी,प्रा.विनोद आचार्य, प्रा.गणेश कांबळे , प्रा.डी.एम. शिंदे,प्रा.विद्यासागर गिरी,सतिश जट्टे, व्यंकटेश पोतदार, प्रवीण देवकर यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी,वकील,शिक्षक आदी रँलीमध्ये सहभागी झाले होते.