बसव प्रतिष्ठानचा बसवरत्न पुरस्कार पत्रकार गणेश खबोले यांना प्रदान

लोहारा / प्रतिनिधी
बसव प्रतिष्ठाण यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील व्यक्तीच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय बसव रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.बसव प्रतिष्ठाण च्या वतीने हे पुरस्काराचे ८ वे वर्ष आहे.यावर्षीच्या पत्रकार क्षेत्रातील पुरस्कारात लोहारा येथील पत्रकार गणेश खबोले यांना दि.१४ रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुरूम येथे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२३ निमित्त बसव प्रतिष्ठाण च्या वतीने मुरूम येथील रत्नमाला मंगल कार्यालय येथे संस्थान हिरेमठ अफझलपूर प ब्र विश्वराध्य मळेद्र शिवाचार्य महास्वामी,विरक्त मठ केसर जवळगा विरेंतेश्वर महास्वामी यांच्या सानिध्यात पार पडलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन सेवानिवृत्त सह संचालक साखर आयुक्यतालय यांच्या हस्ते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते,कृ.उ.बा.स.मुरूम संचालक धनराज मंगरुळे,पत्रकार रोहित पाटील, बसव प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष डॉ.रामलिंग पुराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यभरातील २ व्यक्तींना जीवनगौरव तर १८ व्यक्तींना आरोग्य सेवा,शैक्षणिक,कृषी,पत्रकार,क्रीडा,सामाजिक, राजकिय या सह विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील कोल्हापूर, सोलापूर,लातूर,धाराशिव,सातारा,सांगली जिल्ह्यातील मानकऱ्यांचा या राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते येतोचित्त सत्कार करून सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी उपस्थिती मान्यवरांनी मार्गदर्शन केले तर महाराजांनी आशीर्वाचन पर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कांबळे,प्रास्तविक बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ.रामलिंग पुराणे, तर आभार किरण गायकवाड यांनी मानले.