पद्मिणबाई गणेश दुबे यांचे निधन

लोहारा : शहरातील पद्मिणबाई गणेश दुबे (वय ६५ वर्षे) यांचे शनिवारी (दि.१३) रात्री ८ : १५ वाजण्याच्या सुमारास ह्रदय विकाराच्या झटक्याने लातुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे, नाती, असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्या लोहारा येथील पत्रकार अशोक दुबे यांच्या आई होत.