महाराष्ट्र
लोहारा शहरात बुधवारपासून अखंड हरिनाम सप्ताह

लोहारा ( धाराशिव ) : लोहारा शहरात बुधवारी (१५ जानेवारी) पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण,अखंड हरिनाम नाम सप्ताह व रामकथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लोहरा बसस्थानकाच्या शेजारी हायस्कूल मैदानावर होणाऱ्या रजत मोहत्सवी (२५ वर्षे) वर्षे आहे. या मुळे या सोहळ्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून या साठी नामवंत संत, महाराज हजेरील लावणार आहेत. गुरुवर्य रामराव ढोक महाराज (नागपूर), विनोदाचार्य केशव उखलिकर महाराज, श्रीजयश भाग्यवंत (श्रीमलंगगड, डोंबवली मुंबई), उल्हास सुर्यवंशी (आळंदी), योगीराज गोसावी महाराज (पैठण), गुरुवर्य विठ्ठल वासकर महाराज, गुरुवर्य महेश महाराज माकणीकर, गुरुवर्य गुरुबाबा औसेकर महाराज, गुरुवर्य विठ्ठल दिंडेगावकर महाराज आदी नामवंत महाराजांचे किर्तन होणार आहेत.




