कृष्णा ज्वेलरीचे कुलूप गॅस कटरने तोडून चोरी प्रयत्न करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल

लोहारा (उस्मानाबाद ) : पोलीसाकडून माहीती अशी की,लोहारा येथील अंबादास बाळकृष्ण पोतदार, वय 40 वर्षे यांच्या लोहारा येथील ‘कृष्णा ज्वेलरी’ या दुकानाच्या शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने गुरुवारी 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 2:38 ते 2:40 वाजण्याच्या दरम्यान गॅस कटरने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या अंबादास पोतदार यांनी दि. 03 नोव्हेंबर रोजी लोहारा पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.