नवजीवन गोशाळेस शाहुराज माने यांच्याकडून मदत

उस्मानाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष वैशालीताई गायकवाड यांच्या कळंब येथील त्यांच्या “नवजीवन गोशाळा” या प्रकल्पास महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाहुराज माने यंनी सदिच्छा भेट दिली. व त्यांच्या या उल्लेखनीय कार्यास शुभेच्छा देऊन, गायीच्या चाऱ्यासाठी म्हणून शाहुराज माने यांनी पाच हजार रुपयांची मदत केली.
यावेळी उस्मानाबाद मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र गपाट,तुळजापूर तालुका उपाध्यक्ष श्री अक्षय धनाजी साळवे,उमरग्याचे मनसेचे तालुका उपाध्यक्ष श्री बाबुराव मुळे आदिंची उपस्थिती होते.